जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील वसंतवाडी येथील बाबुलाल संपत महाजन यांच्या शेतातील गोडाऊन मधुन सुमारे दहा ते बारा क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्यांच्या शेजारी शेतकरी राजेंद्र पाटील हे सकाळी चार वाजेच्यासुमारस आपल्या शेतात विहिरीवर पाण्याची विद्युत पंप चालू करण्यास गेले असता त्यांना आण्णा धोंडु पाटील यांच्या शेतात कापसाच्या बोरी पडलेल्या दिसल्या त्यांना शंका आल्याने त्यांनी आपली मोटारसायकल माघारी फिरवली व सदर माहिती पुरुषोत्तम महाजन यांना सांगितली.
त्यांनंतर शेतमालक यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता आपलाच कापूस चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय चिमणकारे यांना सकाळी सव्वा पाच वाजेच्यासुमारास कळविली माहिती मिळताच पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जात पहाणी केली चोरट्यांनी सुमारे एक किलोमीटर अंतरावरून अतिशय दुर्गम रस्त्याने बाबुलाल संपत महाजन यांच्या शेतातील गोडाऊन मधुन कापूस वाहतूक करुन नेरी वावडदा रस्त्याला लागून असलेल्या आंण्णा धोंडु पाटील यांच्या शेतात कापसाचा ढिग मारला तसेच तेरा ते चौदा बोरी अंदाजित पन्नास पंचावन्न किलो वजनाचे या ठिकाणी आणल्या. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन जळगाव यांना कळविल्याची माहिती मिळते