अमळनेर : प्रतिनिधी
येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अमळनेर येथे दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी FDP ( फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एन.के.वाणी हे होते. तर संसाधन तज्ञ व्यक्ती म्हणून रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख हे होते.
कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा महाविद्यालय तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. संसाधन तज्ञ प्राचार्य डॉ. शेख यांनी आपल्या मौलिक विचारात संशोधनाची भूमिका, उपयोगिता आर्टिकल व रिसर्च पेपर यातील फरक तसेच महाविद्यालय व शाखा विकास या संदर्भात अचूक व अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.के. वाणी यांनी नॅक प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन केले. FDP कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. ए.के जोशी प्रा . डॉ. एस. सी. तायडे. प्रा. यु.बी. पाटील प्रा. के .वाय.देवरे उपस्थित होते. जेष्ठ प्रा. डॉ. एन.जी. पाचपांडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन कर्मचारी गिरीश पाटील, किरण रावळ, राजेंद्र वाघ, विनोद सोनवणे, सोपान पाटील, जितेंद्र पाटील, चेतन थोरात यांनी सहकार्य केले