चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरअजंटी गावाशेजारी वनविभागाच्या नाक्याजवळ दुचाकीवर तिघेजण गावठी कट्टा सोबत घेऊन चोपडा शहराकडे येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश मनोहर भोईर (२७, बोरिवली, मुंबई) याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळला. यात राकेश खजरा मोरे (२१) व मुन्ना वेस्ता मोरे (२०, खोकरी, ता. वरला, जि. बडवानी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम, असा एकूण ८६ हजार ४०० रुपयांचा ऐवज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तिघांनाही अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शशिकांत पारधी हे करीत आहेत


