Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अंतर्वस्त्रातून ‘तिने’ आणले ८ कोटींचे कोकेन !
    क्राईम

    अंतर्वस्त्रातून ‘तिने’ आणले ८ कोटींचे कोकेन !

    editor deskBy editor deskDecember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने अंतर्वस्त्र विगमध्ये कोकेन लपवून आणणाऱ्या आदिस अबाबाच्या परदेशी महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.

    विमानाने प्रवास करणारी एक महिला ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच अधिकाऱ्यांनी सापळा लावला. विमानातून उतरलेल्या एका महिलेच्या संशयास्पद हालचालींवरून तिची चौकशी व तपासणी केली असता तिच्या अंर्तवस्त्रात व केसाच्या विगमध्ये हे कोकेन आढळले.

    अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईत उघडकीस आले आहे. वर्षभरात डीआरआयने ड्रग्ज तस्करांचे सर्व फंडे उजेडात आणले आहेत. तस्करीसाठी मद्याच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड, अंगाला लावणाऱ्या क्रीमच्या बाटल्यांमध्ये अमली पदार्थ लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.