Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसचा भीषण अपघात : सहलीला जाणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू तर विध्यार्थी जखमी !
    क्राईम

    बसचा भीषण अपघात : सहलीला जाणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू तर विध्यार्थी जखमी !

    editor deskBy editor deskDecember 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असतांना रस्त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ५ ते ६ लहान विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. ही दुर्देवी घटना माळशिरस तालुक्यातील वटपळी परिसरात गुरुवारी (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
    जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी १९ डिसेंबर कोकण दर्शनासाठी गेली होती. या बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. गुरुवारी पहाटे बस गणपतीपुळे येथून इंदापूरकडे येत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

    क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका शिक्षकासह ५ ते ६ विद्यार्थी देखील जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.