मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच विविध कारणाने चर्चेत येणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हे मात्र आता जरा वेगळ्या चर्चेत आले आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात.
गौरी खान हि देखील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या स्कॅनरखाली येत आहे, ज्याने गुंतवणूकदार आणि बँकांकडून 30 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. वास्तविक, तुलसियानी ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड ऍम्बेसेडर बनवली होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानलाही आरोपी करण्यात आले होते.
तुलसियानी ग्रुपने लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये अनेक प्रकल्प विकसित केले आहेत. या प्रकल्पातील फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी पैसे दिले होते. मात्र, कंपनीने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच, गुंतवणूकदारांना परत पैसेही दिले नाहीत. यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कंपनीचे संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि महेश तुलसियानी यांना अटक केली. या प्रकरणी ईडीनेही चौकशी सुरू केली आहे. ईडीने गौरी खानला नोटीस बजावून त्यांच्याशी चौकशी करण्याची मागणी केली आहे.सध्या गौरी खान या प्रकरणात अडकणार यावर चर्चा रंगली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शाह यांनी तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरोधात राजधानीतील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गौरी खानने कंपनीच्या प्रमोशनमुळे 2015 साली तुलसियानी ग्रुपकडून सुमारे 85 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. नंतर कंपनीने त्यांना ताबा दिला नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत.