Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथीलचे नवीन नियम जाहीर – अभिजित राऊत
    जळगाव

    १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथीलचे नवीन नियम जाहीर – अभिजित राऊत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 14, 2021No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार अनेक क्षेत्रांमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील करण्यात येतील याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. यात खालील प्रकारे शिथीलता मिळणार आहे.

    १) उपहारगृहे / बार – खुल अथवा बंदिस्त उपहारगृहे बैठक क्षमतेच्या ५०% क्षमतेने खालील अटी व शर्ती नुसार सुरु राहतील.

    अ) ग्राहकांना उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करतांना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत
    चेहर्‍यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. याबाबतच्या स्पष्ट सुचना संबंधित आस्थापना मालक /व्यवस्थापक यांना दिल्या आहेत.

    ब) उपहारगृह / बार मध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करु शकतील. तसेच यासर्व कर्मचारी व व्यव्यापक यांनी उपहारगृहात चेह-यावर मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

    क) वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायु विजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील.

    ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील.

    इ) उपहारगृह / बार मध्ये विहीत शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.

    फ) उपहारगृह/ बार मध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील. तसेच उपहारगृहे / बार सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तथापि भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ०९.०० वाजेपर्यंत घेता येईल, मात्र पार्सल सुविधा २४ तास सुरु ठेवता येईल.

    २) दुकाने :-

    अ) सर्व व्यापारी दुकाने दररोज रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. दुकानात काम करणार्‍या सर्व व्यवस्थापक व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील.

    ब) सर्व दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काऊंटर समोर एका वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

    तसेच पारदर्शक प्लास्टीक शिट,ऋरलश डहळशश्रव यांचा वापर करावा. सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

    ३) शॉपिंग मॉल्स :-

    शॉपिंग मॉल्स दररोज रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तथापि शॉपिंग मॉलमध्ये काम करणा-या सर्व व्यवस्थापक, कर्मचारी व प्रवेश करणा-या सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेले आवश्यक राहील. लसीकरणाचे प्रमाणपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहील.

    ४) जिम्नॅशिअम, योगा सेंटर, सलून, स्पा सेंटर :-

    वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा सेंटर ५०% क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तथापि उक्त संस्था वातानुकूलित असल्यास, वायु विजनासाठी पंखा व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.

    ५) इनडोअर स्पोर्टस :-

    इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेले आवश्यक राहील. तसेच अशा ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील व खेळाडूंना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच प्रकारच्या खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु ठेवावेत.

    ६) कार्यालय / औद्योगिक आस्थापना / सेवाविषयक आस्थापना :-

    अ) सर्व शासकीय /निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी , बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनसिपल कर्मचारी व
    व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.

    ब) ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण

    क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचार्‍यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे, ज्या आस्थापना वरील कर्मचा-यांना घरुन काम करणे शक्य आहे, अशा आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचार्‍यांना घरुन काम करण्याची मुभा द्यावी व कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचार्‍यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करावे.

    ड) खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवता येतील. मात्र अशा सर्व व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादीत करणे आवश्यक राहील.

    ७) मैदाने , उद्याने :- स्थानिक प्राधिकरणाकडून विहीत करण्यात आलेल्या वेळेनुसार नियमित सुरु राहतील.

    ८) विवाह सोहळे :-

    अ) खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन/ मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवता येतील.

    ब) खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणा-या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.

    क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.

    ड) कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकार्‍याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निबंधांचे उल्लंघन करणा-यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

    इ) मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन/ भोजन व्यवस्थापन / बँड पथक/भटजी/ फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

    ९) सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स :-

    जिल्हयातील सर्व सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र व शॉपिंग मॉलमधील) बंद राहतील.

    १०) धार्मिक स्थळे :-

    जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.

    ११) आंतरराज्य प्रवास :-

    ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे, त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी ठढझउठ चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील.

    १२) कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी /जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व

    सांस्कृतिक

    कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे इत्यादी वरील निर्बध कायम राहतील.

    १३) नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना उदा. मास्कचा वापर करणे,हातांचे सॅनेटायझेशन करणे, डिस्टन्सींग पाळणे आदींचे पालन करावे.

    १४) सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी तसेच या कर्मचार्‍यांची यादी (लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम
    प्राधिका-यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.

    १५) दुकाने / उपहारगृहे /बार /मॉल्सचे | कार्यालये | औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जंतुकीकरण व सॅनिटाईजेशन करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशू पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहीत कार्यपध्दतीने विल्हेवाट करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

    वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात काही प्रमाणात निबंध लागू करण्यात आलेले असून नागरिकांनी चेहर्‍यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींचे पालन करणे व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावली यांचे काटेकोर पालन करणे हे अनिवार्य राहील. तथापि विनामास्क फिरणे, गर्दी करणे (सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे) व सार्वजनिक ठिकाणी उघडयावर धुंकणे या बाबींचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर रक्कम रुपये ५००/- प्रमाणे दंडाची आकारणी करण्याबाबतची कारवाई संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील असे यात नमूद करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025

    किराण्यासाठी पैसे काढायला गेलेल्या माजी पोलिसांची फसवणूक; एटीएममध्ये कार्ड अदलाबदल

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.