जळगाव : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यानी टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील धानवड येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आजाराला आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात म्हटले आहे की, “आजाराला आणि कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले होते. शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.