जळगाव : प्रतिनिधी
शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांसह शेतीकामात मुक्या जनावारांची मोठी मदत होते. शेतात राबतांना अनेक जनावरांना कमी अधिक प्रमाणात इजा होत असतात. त्यावर उपचार करण्यासाठी तालुक्याच्या गावी जाणे देखील जमत नाही. या समस्येवर फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चांगला उपाय जिल्ह्यात समोर आला.
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला पाच फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यातील एक रुग्णवाहिका धरणगाव तालुक्याला मिळाली. आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुक्या जनावरांवर वेळीच व योग्य उपचार करणे सोपे होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मंगळवारी धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे या रुग्णवाहिकेच्या कामकाज जाणून घेत शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, भागवत शेठ, सुरेश पाटील, किशोर पाटील, युवा सेना तालुका संघटक अमोल पाटील, राहुल पाटील, किशोर महाराज, डॉ. महाजन, डॉ. गौरव पाटील व गावकरी उपस्थित होते.