धरणगाव लक्ष्मण पाटील : येथे आत्मा समितीची बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम CDS बिपीन रावत यांना श्रदधांजली अर्पण करुन सदरील बैठकीस सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित सर्व सदस्यांचे आत्मा व कृषी विभागाकडून स्वागत करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील व राज्य पातळीच्या समितीच्या सदस्य पदी निवड झालेले राजेंद्र महाजन यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी केला. सदरील बैठकीत आत्मा योजनेबाबत संपूर्ण माहिती आत्मा बिटीएम दीपक नागपुरे यांनी उपस्थित सर्व सदस्यांना दिली.
आत्मा योजनेअंतर्गत गट स्थापन करून शासकीय योजनेचा काय काय लाभ घेता येईल याची सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी महाडीबीटी यांत्रिकीकरण या योजनेबाबत सर्व सदस्यांना माहिती दिली. सदरील बैठकीत प्रसंगी पं.स. सभापती प्रेमराज पाटील, देविदास भदाने, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, देवीदास पाटील, रामचंद्र माळी, जगदीश चव्हाण, वाल्मीक पाटील, श्रीकांत लंके, भगवान पाटील, पोपट पाटील शरिफ देशपांडे, नाटेश्वर पवार, मोहन पाटील, उषाताई वाघ, संगीता सोनवणे, राधाबाई साळुंखे, पं.स. कृषी अधिकारी एस.डी. पाटील , मंडळ अधिकारी अरुण कोळी, राजेंद्र लोहार, किरण वायसे, चंद्रकांत जाधव, गजानन मोरे, दिलीप ठाकरे, विमल सुरावार आदी उपस्थित होते. सर्व सदस्यांना आत्मा बीटीएम दीपक नागपुरे यांनी सुचित केले की सर्वांनी प्रति सदस्य एक शेतकरी गट स्थापन करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बैठकीचा समारोप अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी आभार मानून केला.