पाळधी – येथील सुप्रसिद्ध जीपीएस मित्र परिवार सध्या परिसरात खूप चर्चेत आहे, कारण पण तसेच आहे जीपीएस मित्र परिवार म्हणजे आपुलकी, स्नेह, सामाजिक एकोपा या साठी प्रसिद्ध आहे.ग्रुप साठी कायम झटणारे जीप सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रुपच्या सदस्यांसाठी सुरक्षा विमा कवच स्वतःच्या खर्चाने काढून देत ग्रुप मधील सदस्यांची काळजी कशी घ्यावी याचा प्रत्यय आज दाखवून दिला.
अल्पावधीतच पाळधी येथील GPS ग्रुप ने इतके नाव कमविले की परिसरातील नागरिक पण याची दखल घेत आहे. ग्रुप तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव त्यात सर्व सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप असो, नवरात्र उत्सव तर पाळधी परिसरात खूप चर्चिला गेला कारण तरुणी, महिला वर्ग यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून भव्य असे दांडिया, गरबाचे आयोजन करण्यात आले. याच गरबा,दांडिया च्या उपक्रमांनी महिला वर्गात GPS ग्रुप विषयी खूप आपुलकी निर्माण झाली आहे. तसेच अवकाळी थंडी जेव्हा पडली तेव्ह पण गरीब, निराधार, अनाथ नागरिकांसाठी GPS ग्रुप धावून गेला व त्यांना थंडीत मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला, नुकत्याच पार पडलेल्या शिवमहापुराण कथे साठी GPS ग्रुप तर्फे मोफत भोजन चे रोज 25000 लोकांसाठी वाटप करण्यात आले, अश्या या सामाजिक कार्य साठी GPS मित्र परिवार अग्रेसर असतो. अश्या या ग्रुप साठी कायम झटणारे लाडके जी प सदस्य प्रतापराव पाटील हे कायम नवनवीन संकल्पना मांडत असतात. परिवारातील प्रत्येक सदस्याची काळजी घेत असतात ,परिवार मध्ये उद्योगपती ,व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरी ते रोजनदारी काम करणारे सदस्य आहे. पण प्रतापराव यांनी कधीच भेदभाव न मानता प्रत्येक सदस्य हा माझा आहे माझ्या परिवारातील आहे हीच भावना कायम ठेवली, इतकेच नाही तर प्रत्येकाच्या सुख दुःख मध्ये पुढे असतात याचाच प्रत्येय आज आला, परिवार माझा आहे सदस्यांची काळजी म्हणून आज प्रत्येक सदस्याचा 10 लाखाचा विमा स्वखर्चाने काढून दिला व 60 हजाराचा मेडिक्लेम सुद्धा उपलब्ध करून दिला.