लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ग्लोबुसेल या लाईफ सेव्हिंग औषध खरेदी विक्रीचा वैध परवाना नसतांना हे औषध विक्री केल्याचा खोट्या व बनावट बिले तयार करून फसवणूक केल्याचा भयंकर प्रकार चाळीसगावात उघडकीस आला असून याप्रकरणी औषध निरीक्षक, जळगाव यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, ग्लोबुसेल हे लाईफ सेव्हिंग औषध असून ते सुदृढ व्यक्तीच्या रक्तापासून निर्माण केले जाते. असे असतांना संशयित जितेंद्र प्रभाकर खोडके रा. कळमडू ता. चाळीसगाव जि. जळगाव मालक जोगेश्वरी फार्मा, शॉप नं.60, घाटे कॉम्पले्नस, भडगाव रोड, चाळीसगाव यांनी त्यंाचा औषध खरेदी विक्रीचा वैध परवाना नसतांना तसेच ग्लोबुसेल इंजे्नशन उत्पादन करणारी इंटास फार्मासिटीकल लिमीटेड कंपनीने जागेश्वरी फार्मा यांना ग्लोबुसेल इंजे्नशन बॅच नं97130072 हे विक्री केलेले नसतांना गैरमार्गाने जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने ग्लोबुसेल इंजे्नशन बॅच नं 97130072 चे एकूण 220 व्हायल (कुप्या) प्राप्त केल्या व त्या औषध खरेदी विक्रीचा परवाना नसलेल्या सुनील ढाल यांच्या मालकीच्या श्री क्रिढा इंटरनॅशनल हेल्थकेअर कंपनीचे नोेंदणीकृत कार्यालय हे युनिट नंबर 21,13 वा मजला, सुश्मा इनफिनिनियम, निअर बेस्ट प्राईस, जिल्हा झेरकपूरख सासनगर यांना विक्री केल्या व खरेदीची बनावट बनावट बिले तयार केली.
ही घटना 20/10/2021 ते 1/11/2021 या दरम्यान जोगेश्वरी फार्मा, शॉप नं 60,घाटे कॉम्पले्नस, भडगाव रोड, चाळीसगाव तसेच पंजाब व चंदीगड येथे घडली.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी व्यवसाय औषध निरीक्षक, जळगावचे डॉ. अनिल माधवराव माणिकराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जितेंद्र प्रभाकर खोडके (27) रा. कळमडू व सुनील ढाल, रा. हाऊस नंबर 13, 138 राजव्हिला, डेराबस्सी, सासनगर, पंजाब यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420,465,468,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.
संसर्ग प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नव्याने ओमीक्रोन व्हेरियंट आढळून आलेला आहे. आशा परिस्थितीत संसर्ग प्रतिकारशक्ती वाढविणारे बनावट औषधी विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न औषधे प्रशासन विभागाला मिळाल्यानुसार नाशिक व जळगाव औषधे विक्री अधिकारी यांच्या पथकाने जळगाव आणि चाळीसगाव येथे 4, 6 आणि 7 डिसेंम्बर रोजी धाडसत्र कारवाई करण्यात आली. घाटे कॉम्प्लेक्स मधील जोगेश्वरी फार्मा येथे मालकाकडे औषध विक्री परवाना नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी 2लाख 76 हजार रुपये किमतीचा औषधी साठा जप्त करण्यात आला असून जितेंद्र प्रभाकर खोडके या मेडिकलच्या मालकावर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव औषध प्रशासन विभाग निरीक्षक माणिकराव यांनी दिली.