नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने शेजाऱ्यासोबत भांडण झाले असून या भांडणात शेजाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची तक्रार झाल्यानंतर पाेलिस संबंधित संशयित आराेपीस पकडण्यासाठी गेले असता त्याने दहशत निर्माण करण्यासाठी नांदेड पाेलिसांवर तलवार उगारली. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी स्वसरंक्षणासाठी संशयितावर गोळीबार करुन त्यास अटक केली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेरसिंघ गिल हा एका खून प्रकरणातून पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत त्याचे काही कारणाने भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ गेले असता शेरसिंघ त्यांच्यामागे तलावर घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हुदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शेरसिंघ यास पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले असता त्याने गॅस सिलेंडर पेटवण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांवर तलवार उगारली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेने चार ते पाच गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या त्याच्या पायावर लागल्या. त्यानंतर पाेलिसांनी त्याला पकडले तसेच अटक केली.