जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार जळगाव शहरात येवून दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी हातात सुरा घेवून दहशत माजवीत असतांना एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी. पोलीस स्थानकाच्या हद्यीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार 1) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर, (वय २०) रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव, 2) निशांत प्रताप चौधरी, (वय २०) वर्ष, रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव यांना पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांचे आदेशान्वये दिनांक १९/१०/२०२३ रोजी पासुन ०२ वर्षाकरीता जळगाव जिल्हयातुन हद्यपार करण्यात आले होते. सदरचे हद्यपार इसम हे जळगाव शहरात येवुन दहशत माजवीत असल्याची माहीती मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांना मिळाली त्यानुसार दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी निशांत प्रताप चौधरी, वय 20 वर्ष, रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव सायंकाळी 05:15 वा. तुकारामवाडी जळगाव येथुन ताब्यात घेतले होते. त्याच्या जवळ लोखंडी सुरा मिळुन आला होता. तसेच सायंकाळी 07:15 वा. स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर, वय 20 वर्ष, रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव यास जळगाव शहरातील पांडे चौकाजवळील रामदेव बाबा मंदीराजवळुन ताब्यात घेतले होते. त्याच्या जवळ लोखंडी सुरा मिळुन आला होता. ते हद्यपार कालावधीत त्याच्या जवळ हत्यार बाळगुन जळगाव शहरात फिरत असतांना मिळुन आल्याने त्यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. दिपक जगदाळे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, निती