Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रुग्णवाहिकेतून आणली जात होती दारू ; ९ लाखांची मुद्देमाल जप्त !
    क्राईम

    रुग्णवाहिकेतून आणली जात होती दारू ; ९ लाखांची मुद्देमाल जप्त !

    editor deskBy editor deskDecember 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरु असतांना नुकतेच दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणण्यासाठी तस्करांकडून विविध क्लृप्त्या लढवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. अशाच एका घटनेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेतून करण्यात येणारी दारूची तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी उघडकीस आणली. या कारवाईत जवळपास 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची कुणकुण लागताच रुग्णवाहिकेचा चालक पसार झाला आहे. प्रकरणी दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दमन बनावटीच्य दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुरुवारी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वाडा खडकोना येथील स्वागत हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभे असलेल्या संशयित रुग्णवाहिकेची तपासणी केली असता आतमध्ये बनवलेल्या विशेष कप्प्यांमध्ये दारूचा 34 बॉक्स चा साठा आढळून आला. दारू व रुग्णवाहिका असा जवळपास नऊ लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची कुणकुण लागताच चालक रुग्णवाहिका सोडून आधीच पसार झाला होता. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.