कोल्हापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून देशभरातील अनेक तरुणासह प्रौढाना खूप कमी वयात अनेक आजाराची लागण होत आहे. तर ह्र्दयविकाराचा धक्का देखील अनेकांना येत असतांना नुकतेच कोल्हापूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले उपनिरीक्षक प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४, मूळ रा. अंगापूर, जि. सातारा) यांना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागले. काही वेळातच ते कार्यालयात कोसळले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राज्यपाल रमेश बैस आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या बंदोबस्त तयारीची लगबग सध्या पोलिस दलात सुरू आहे. याच गडबडीत असताना भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. मात्र, काही वेळातच ते कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने प्राणज्योत मालविली