अकोला प्रतिनिधी : मनीष खर्चे
अकोला। विदर्भातील जंनतेला न्याय देन्यासाठी नागपुर करार करण्यात आला होता. त्या करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे घेणे आणि ते पण किमान ६ आठवड्याचे मात्र आजपर्यंतची अधिवेशने ही ६ते १०दिवसात आटोपली ती पण विदर्भातील मुद्यांवर न होता केवळ हुलड बाजी करण्यात येत आहे. यावर्षीच्या अधिवेशनात चिल्लर विषयांवर चर्चा करून अधिवेशन पार पाडले जात आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटिल व छगन भुजबळ यांच्यातच चर्चा करण्यात वेळ वाया घालवला गेला आहे. त्यामुळें विदर्भ मुद्यांवर चर्चा करण्यासाठी नागपुर करारा नुसार अधिवेशन घेतलें जात नसल्याचे आरोप करीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन येत्या २७डिसेंबर रोजी ५००० म्हातारे, म्हाताऱ्या आणि युवक, युवतीयांच्या उपस्थितीत नागपुर येथील संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी आज दिली.
विदर्भात, कोयला खाणी आहेत. तसेच विद्युत निर्मिती विदर्भात होत असताना विदर्भातील जनतेला महागडी वीज घ्यावी लागते. यासोबत च स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ११७वर्षे पासुन असुन अजूनही ती मागणी पुर्ण केली जात नाही. उलट विदर्भ विकासासाठी आवश्यक हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतांना गौतमी पाटील यांच्या नाचाचे कार्यक्रंम आयोजीत करून राज्याचे मंत्री, आमदार फ्कत सहल करण्यासाठीं येतात असाही आरोप करताना त्यांनी सांगीतले की, विदर्भातील आमदार सर्व सामान्य जनतेचे प्रश्नांवर बोलत नसल्याने माझ्या सारख्या पत्रकाराला हाऊस मध्ये बोलावे लागत आहे. राज्याचे मंत्रिमंडळ विदर्भात नागपुर ला येत असतील तर केवल विदर्भ आणि विदर्भातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करा अन्यथा आम्हाला आमचे स्वतंत्र विदर्भ राज्य द्या. अशीही मागणी त्यांनी आज केली.विधानसभेत गुरूवारी मराठा आरक्षणावर चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत सुरू होते सायंकाळी कामकाज सुरु सूरू होते.या प्रश्नावर चर्चा करायची असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवाव किंवा त्या विषयावर स्वतंत्र अधिवे शन बोलवा अशीही सूचना त्यांनी अज केली पत्रकार गॅलरीत येऊन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे पाहात हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही अंशी विचारणा केली होती. पोहरे एवढ्यावरच थांबले नाहीतर खाली उतरीत मीडियासमोर येऊन स्वत:च बाईट दिला. अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यांवर बोलत नसल्याचे सांगितले.