अहमदनगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील शिर्डी शहरातील नगर- मनमाड रोडनजीकच्या हॉटेलमध्ये साईदर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल किशोर वारुळे (वय 30, रा. खैरी निमगाव, हल्ली चाकण, पुणे) व निकिता किशोर वारुळे (वय २५) या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलचालक वसीम आयुब शेख (रा. शिर्डी) यांनी घटनेची माहिती शिडीं पोलिसांना दिली. मयताने डायरीवर वडिलांचा फोन नंबर लिहून ‘आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे लिहिले होते.