चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बहाळ येथे गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याने अनेक ठिकाणी जनावरांच्या शिकारी केल्या आहेत. तसेच मादीसह दोन बछड्यांचे नेहमी परिसरात दर्शन होत आहे. आता पुन्हा बिबट्याने वासरू फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने गावालगतच हाकेच्या अंतरावर असलेल्या नथ्थू पुना परदेशी यांच्या मालकीच्या शेतातून गायीचे वासरू फस्त केले आहे. त्यामुळे बहाळसह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान, या संदर्भात वनविभाग अधिकारी शितल नगराळे यांना अनेक ठिकाणी कॅमेरे देखील लावले आहेत. परंतु बिबट्याकडून नेहमी हुलकावणी दिली जाते. परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शेताचे कामाची धावपळ होत आहे. परिसर बिबट्या असल्यामुळे मजूर कामाला येण्यासाठी धास्तावत नाहीत. तर वन विभागाने या बिबट्याला त्वरित जर बंद करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.