लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील एका तरुणांची लोन मजूर करण्यासाठी विविध प्रकारे त्याच्याकडून ऑनलाईन ८ लाख ३४ हजाराचा गंडा घातला. याप्रकरण सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबात माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील
पळासखेडा येथे गजानन लक्ष्मण सोनवणे (वय-३७) हा आपल्या कुटुंबा सोबत राहत असून तो २७ सप्टेंबर रोजी त्यांला बजाज फायनान्स प्रतिनिधी नावाने बनावट कॉल आला. त्यांनी बजाज फायनान्स कडून ५ लाख रूपयांचे पर्सनल लोन मंजूरी करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ चार्जेस लावण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ८१७ रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वाकारले. त्यानंतर समोरील व्यक्तीने बजाज फायनान्सचे लोन मंजूरीचे बनावट लेटर पाठवून फसवणूक केल्याचे २७ ऑक्टोबर रोजी समोर आले. याप्रकरणी गजानन सोनवणे यांनी ८ डिसेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.