Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन मुलांचा बाप पडला सासूच्या प्रेमात अन रात्री सापडला !
    क्राईम

    तीन मुलांचा बाप पडला सासूच्या प्रेमात अन रात्री सापडला !

    editor deskBy editor deskDecember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    सध्या सोशल मिडीयाच्या युगात कोण कुणाच्या प्रेमात पडते कुणीही सांगू शकत नाही अशीच एक घटना घडली आहे. तीन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाचं आपल्याच सासूवर प्रेम जडलं. खरं तर सासू देखील त्याच्या प्रेमात पडली होती. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला होता, की त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं. अशातच पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं.

    मिळालेल्या माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन अपत्ये देखील झाली. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले. त्याचा सासरा आणि मेहुणा बाहेरगावी कामाला असल्याने सुनील आपल्या पत्नीला अंधारात ठेऊन नेहमी सासूला भेटण्यासाठी जात होता.
    रविवारी सुनीलचे पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर तो सासूला भेटण्यासाठी कल्ला गावात पोहचला. तिथे दोघेही भेटत असताना अचानक सुनीलचा सासरा आणि मेहुणा घरी आला.

    त्यांनी सुनीलला सासूसोबत नको त्या अवस्थेत बघितले. यावरून दोघांनाही राग अनावर झाला त्यांनी गावातील लोकांना बोलावून सुनीलची चांगलीच धुलाई केली. गावातील लोकांनी सुनीलला एका झाडाला बांधून ठेवले. याची माहिती त्याच्या पत्नीला देखील देण्यात आली. आईसोबत नवऱ्याचे प्रेमसंबध असल्याचं कळताच सुनीलच्या पत्नीलाही राग अनावर झाला. तिने देखील त्याला चप्पलेने मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.