नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असून अनेकांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा तरुणाचे स्वप्न साकार होण्याची बातमी समोर आली आहे. आता थेट समाजकल्याण विभागामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मोठी मेगा भरती सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या समाजकल्याण विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी संबंधित अधिकृत साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया 200 पदांसाठी सुरू आहे. 15 डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी jkssb.nic.in या साईटला भेट देऊन अर्ज करावा. 40 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा इंग्रजीमध्ये पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फिस भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.