• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

करणी सेनेचे अध्यक्षांच्या खुनाप्रकरणी तीन अटकेत !

editor desk by editor desk
December 11, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
करणी सेनेचे अध्यक्षांच्या खुनाप्रकरणी तीन अटकेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात राजस्थानातील राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण तापले होते. आता याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना चंदिगड येथून अटक केली. तिघेही चंदिगड सेक्टर 22 ए येथे लपून बसले होते. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत तिघांनाही पकडले. रोहित राठोड, नितीन फौजी, आणि उधम अशी तिघांची नावे आहेत.

तिघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर जयपूरला नेण्यात आले. याआधी जयपूर पोलिसांनी शूटर्सची मदत करणाऱया रामवीरला अटक केली होती. तिघांमधील एक रोहित राठोड (गोदारा) हा गँगस्टर लॉरेन्स विष्णई गँगचा असून त्याने गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गोदारा 2022 मध्ये बनावट पासपोर्टद्वारे देश सोडून पळाला होता.

तिघेही नाव बदलून गेस्ट हाऊसमध्ये लपून बसले होते. दविंदर कुमार, जयवीर सिंग आणि सुखबीर सिंग अशी नावे त्यांनी धारण केली होती तसेच बनावट आधार कार्डही दिले होते. गोगामेडी यांच्या हत्येनंतर शूटर नितीन फौजी आणि रोहित ठाकूर राजस्थानच्या दिडवाना येथून चुरू-दिल्ली रोडवेज बसमध्ये चढले. राष्ट्रीय महामार्गावरील रेवाडीच्या धरुहेरा गावात सकाळी उतरले. त्यानंतर वाहनाने ते रेवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचले. येथून त्यांनी ट्रेनने हिस्सार गाठले. हिस्सारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते आढळून आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास करत मोबाईलद्वारे लोकेशन मिळवून चंदिगड येथून तिघांनाही ताब्यात घेतले.

Previous Post

शेतकरी सापडला पुन्हा संकटात : पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला !

Next Post

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण !

Next Post
तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण !

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group