पुणे : वृत्तसंस्था
सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभरातील महिला व पुरुष एकाच ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारी घटना देखील यातून घडत आहे. नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवून एका महिलेचा विनयभंग केला. तर महिलेच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत पीडित महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.
याबाबत कर्वेनगर येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश सुनिल शहाणे (रा. साततोटी पोलीस चौकी जवळ, कसबा पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354/A/1, 504 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश शहाणे हा फिर्य़ादी यांच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. त्याने फिर्य़ादी यांच्या मोबाईलवर महिला व पुरुषांचे न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवले. याचा जाब विचारला असता आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या आणखी एका मैत्रिणीला आरोपीने अश्लील मेसेज केले. तसेच वारंवार फोन करुन त्रास देऊन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.