पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आता पुणे शहरात देखील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना अशीच एक घटना विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कॅफेमध्ये कॉफी पित असताना महिलेचा हात पकडून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील कॅफे कॉफी पिक येथे शुक्रवारी (दि.8) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 36 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ध्रुव सक्सेना (वय-२७) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्य़ादी यांच्या ओळखीचा आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महिला पोरवाल रोडवरील कॅफे कॉफ पिक येथे कॉफी पित लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी अचानकपणे आला. त्याने फिर्य़ादी यांचा हात पकडून गैरवर्तन करुन विनयभंग केला. त्यावेळी महिलेने त्यांचा हात सोडवून घेतला असता आरोपीने शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.