Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हृदयद्रावक : आयशरच्या धडकेत मुलगी ठार तर वडील जखमी !
    क्राईम

    हृदयद्रावक : आयशरच्या धडकेत मुलगी ठार तर वडील जखमी !

    editor deskBy editor deskDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर : प्रतिनिधी

    सायकलस्वार वडील व मुलीस ट्रकने जोरदार धडक दिली. यात मुलगी जागीच ठार, तर वडील जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता पहूर-छ. संभाजीनगर महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (११) ही पाचवीतील विद्यार्थिनी शुक्रवारी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात निवड प्रक्रियेसाठी शाळेकडून पत्र घेऊन जळगावाला येणार होती. त्याआधीच हा अपघात घडला. पहूर कसबेतील रहिवासी पत्रकार व शिक्षक शंकर भामेरे (४०) व कन्या ज्ञानेश्वरी हे सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाले. छ. संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवरील अर्धवट पुलाच्या कामाच्या ठिकाणी मागून आलेल्या ट्रकने सायकलला जबर धडक दिली. यात शंकर भामेरे किरकोळ जखमी झाले, तर ज्ञानेश्वरी हिचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक सुनील ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवती, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.