गडचिरोली : वृत्तसंस्था
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृद्ध आजी-आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास चक्रे गतिमान केली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अहेरी
तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
यामध्ये अर्चना रमशे तलांडे (१०, रा. येरकल, ता. एटापल्ली), देवू दसरू कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५, रा. गुंडापुरी, ता. भामरागड) अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मुलगी मरकल (ता. एटापल्ली) येथे राहते. चौथीत शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळी सुटीत आजी-आजोबांकडे आली होती.