• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दीडशे ग्रॅम सोने, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी : अखेर डॉक्टर महिलेने संपविले जीवन !

editor desk by editor desk
December 7, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
दीडशे ग्रॅम सोने, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी : अखेर डॉक्टर महिलेने संपविले जीवन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यातील विवाहित महिलांना हुंड्यासाठी छळ करीत असल्याच्या घटना नियमित घडत असतात अशीच एक धक्कादायक घटना केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये 26 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी या मुलीचा बळी दिला गेला. कुटुंबीय हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. शहाना यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी महिलेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. शहाना तिची आई आणि दोन भावंडांसोबत राहत होती. आखाती देशात काम करणाऱ्या डॉ.शहानाच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ती डॉ. ईए रुवैस यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. रुवैस यांच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून 150 ग्रॅम सोने, 15 एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्याचा आरोप शहाना यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्थानिक वृत्तपत्र मातृभूमीच्या वृत्तानुसार, जेव्हा डॉ. शहानाच्या कुटुंबीयांनी सांगितले की ते मागणी पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा तिच्या प्रियकराच्या कुटुंबाने लग्न रद्द केले. यामुळे तरुणी डॉक्टर अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्याच्या अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये “प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत” असे लिहिले होते.

या प्रकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या महिला व बालविकास विभागाला हुंडा मागणीच्या आरोपांबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगही या प्रकरणात लक्ष घालत आहे. समितीचे अध्यक्ष ए.ए. रशीद यांनी जिल्हाधिकारी, शहर पोलिस आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना १४ डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी सतीदेवी यांनी डॉ. शहाना यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली. हुंड्याच्या मागणीमुळे झालेल्या मानसिक त्रासाने तरुण डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले असेल, तर कठोर कारवाई करावी, असे सतीदेवी म्हणाल्या.

Previous Post

क्रूझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post

तयार होतोय महाधन राजयोग; या राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण

Next Post
तयार होतोय महाधन राजयोग; या राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण

तयार होतोय महाधन राजयोग; या राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group