अकोला : मनीष खर्चे
राज्यातील अनेक जिल्ह्यातून नेहमीच गोवंश चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना यावर आता अकोला जिल्हयामध्ये गोवंश चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, संदिप घुगे अकोला यांनी स्थानिक गुच्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक, शंकर शेळके यांना मार्गदर्शक सुचना देवुन जिल्हयातील गोवंश वोटरीये गुन्हें उपहकिस आणण्याबाबत सुचना दिल्या त्यावरून आज दिनांक ०६.१२.२०२३ रोजी गोपनिय माहिती मिळाली कि, वाशिम बायपास परीसरातील हुसैनी शॉप च्या पाठीमागे एका पांढ-या रंगाच्या टाटा व्हिस्टा एम एच २०, डी एप्फ ०३११ या वाहनामध्ये पातुर परीसरातुन गोवंश चोरीकरून येत आहे.
अशा माहिती वरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचुन कार्यवाही केली असता तेथे एक पांढ-या रंगाची टाटा व्हिस्टा कार ज्यामध्ये गोवंश जातीचे ०१ गाय व ०१ कालवड अस निर्दयीपणे कोंबुन सदर जनावरे कारमधुन काढतांना ०२ इसम १) शेख सोहेल शेख युसुफ, वय २८ वर्षे, रा. भारत नगर अकोट फाईल, अकोला. २) एजाज शाह युनुस शाह, व्य ३८ वर्षे, रा. भगतवाडी, अकोला असे मिळुन आल्यानं टावर जनावरावे मालकी हयकाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे गोवंश पातुर परीसरातुन चोरी केल्याचे कबुली दिल्यानं त्यांना तत्काळ साध्यास घेवुन व सदरचे जनावरांची वैद्यकिय उपचार करून तात्पुरत्या वारापाण्याची व्यवस्था करून सदरचे आरोपो ब वाहने पो.स्टे. पातुर यांच्या ताब्यात दिले. पो.स्टे. पातुर येथे अप नं. ५४०/२३, कलम ३७९ भादंवि दाखल असुन सबर गुन्हयातील ०२ गोवंश व ०१ टाटा व्हिस्टा कार असा एकुण २, २७,७०० रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. श्री अभय डोंगरे मा. पोलीस निरीक्षक, शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, सपोउपनि दशरथ बोरकर, पोहवा उमेश पराये, पोहवा गोकुळ चव्हाण, नापोकॉ खुशाल नेमाडे, पो.कॉ. आकाश मानकर, गोहम्मद अमिर, अन्सार १२ लिलाधर खंडारे, अभिषेक पाठक, सुलतान पठाण, भास्कर थोत्रे, चालक पोकॉ अक्षय बोबडे यांनी केली आहे.