जळगाव;– भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम रविवार, 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता तसेच कोरोनायोध्दा डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांनी उपस्थित राहावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.यादिवशी सकाळी 8.30 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्यानंतर आयोजित करावा. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.