पुणे : वृत्तसंस्था
चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील एका परिसरात घडली आहे. हडपसर भागातील औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत ही घटना घडलीये. मोतीलाल साहू असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोतीलालचे मामा शंकरदिन यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरदिन आणि आरोपी धीरजसिंग हडपसर औद्योगिक वसाहतीतील पूना फ्लोअर अँड फूड्स कंपनीत काम करतात. दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल कामासाठी मामा शंकरदिनकडे आला होता. मोतीलाल आणि धीरजसिंग यांची मैत्री झाली.
कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने मोतीलालच्या गुदद्वारात हवा भरली. हवा पोटात शिरल्यामुळे शारीरिक इजा होऊन मोतीलालचा जागीच मृत्यू झाला. मजा मस्करीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. अनेकवेळा मोठ्या चुका करून वक्ती मृत्यूच्या दहाडेतून परत येतात. मात्र अनेकदा पुढे मोठं संकट आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी लिहिलाय याची कुणालाच काही कल्पना नसते. सर्व नेहमीसारखं सुरू असताना मस्करीची कुस्करी होऊन अनेकांचा आजवर मृत्यू झालाय. त्यामुळे प्रत्येकाने मजा मस्करी करताना आपल्यामुळे एखाद्याला हाणी पोहचणार नाही याबात काळजी घेतली पाहिजे.