पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात आज देखील जादूटोण्याच्या घटना घडत आहेत अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडला आहे. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदूबाबाने युवकाचे 18 लाख रुपये पळवले आहेत. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशाचा पाऊस पडण्याच्या धक्कादायक प्रकाराची नाेंद पाेलीसांत झाली आहे. पाेलीस घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत.
मिळालेल्य माहितीनुसार, कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत युवकाचे 18 लाख रुपये पळवणारा बाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद छोटेलाल परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पैशाचा पाऊस पडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही पाेलीस तेथे आले. त्यांनी बाबासह युवकाला मारहाण केली. त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पाेलीस पसार झाले. त्यानंतर अन्य लाेकही घटनास्थळावरुन पसार झाले. पूजेच्या ठिकाणी आलेले पाेलीस हे बनावट हाेते अशी खात्री परदेशी यांची झाली. त्यानंतर हडपसर पोलीसांत त्यांनी धाव घेत संबंधित प्रकाराची माहिती दिली. त्यानूसार या प्रकरणी भोंदू बाबासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शाेध घेत असल्याचे पाेलीसांनी सांगितले.