अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील घारगाव येथे शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार तर आठ वारकरी जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावर घडला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताराबाई गंगाधर गमे (वय ५२, रा. कोन्हाळे, ता. राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (५०, रा. कनकुरी, ता. राहाता), बबन पाटीलबा थोरे (६५, रा. शिर्डी, ता. राहाता), बाळासाहेब अर्जुन गवळी (५०, रा. मढी, ता. कोपरगाव), अशी अपघातातील मयतांची नावे आहेत