लाईव्ह महाराष्ट्र न्यूज – सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या झालेल्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सद्यस्थितीत जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीतील ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक स्थगीत करण्यात येत असून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण जागांवरील निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असल्याचे जाहिर केले आहे. त्यात जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीतील ओबीसी वार्ड मधील निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे निर्देश आहेत. तर जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी मंगळवारी ७ डिसेंबर अखेर अर्ज दाखल झाले असून ओबीसी वार्डच्या निवडणूकाच रद्दचे आदेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी जाहिर करण्यात आलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील जि.पं., पं.स. व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकांवर या निर्णयाचा परिणाम होणार असून राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी ओबीसी प्रभागातील निवडणुक प्रकियेला स्थगिती देण्यात आल्याचे दिलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसेाबतच जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीमधील निवडणुकांसाठी ज्या जागांवर ओबीसी प्रवर्ग राखीव करण्यात आले होते त्या जागांवरील निवढणूक स्थगित करण्यात आली असून नगरपंचायतीतील ओबीसी प्रभाग वगळता इतर जागांवरील निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
दरम्यान, बोदवड नगरपंचायतीसाठी सुध्दा २१ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या मुदतीअंती बोदवड नगरपंचायीत प्रभागांसाठी सदस्यांच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार येथील ओबीसी आरक्षण असणार्या जागांवर निवडणूक होणार नसल्याचे निर्देश आले असल्याने ओबीसी जागा वगळता अनूसुचित जाती, जमाती, सर्वसाधारण प्रभागातील निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.