नंदुरबार : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद रस्त्यावर मोड ते उमरी गावादरम्यान भरधाव वेगातील बुलेटने धडक दिल्याने तीन वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. गोपाळ विठ्ठल ठेलारी (रा. ऐचाळे, ता. साक्री, जि. धुळे) असे जखमी बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी जखमी बालक याचे आई-वडील तळोदा ते बोरद रोडवरील मोड ते उमरी गावादरम्यान मेंढ्या चारत असताना रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच ४१-एमएल ९५३९ या बुलेटने गोपाळ याला धडक दिली. यानंतर मोटारसायकलस्वार पसार झाला. घटनास्थळावरून दरम्यान, पालकांनी मुलाला नंदुरबार येथे उपचारांसाठी दाखल केले होते. उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी दगा खुशाबा ठेलारी यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित एमएच ४१- एमएल ९४३९ क्रमांकाच्या बुलेट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विजय विसावे करीत आहेत.