मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्या तरूणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे.
नाव – नमो महारोजगार मेळावा
कोणकोणत्या पदांसाठी होणार मेळावा –
फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे
पद संख्या – 10,000+
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी
मेळाव्याची तारीख – दि. 09 आणि 10 डिसेंबर 2023
मेळाव्याची वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 पर्यंत
मेळाव्याचे ठिकाण – जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र