धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका सामाजिक कार्यकर्ते वैभव बोरसे यांनी आपल्या मुलीचा प्रथम वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील एका मूकबधिर शाळा अन्नदान करून साजरा केल्याने परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वैभव बोरसे यांनी आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मुलगी स्वरा बोरसे हिचा प्रथम वाढदिवसाच्या अवचित्त साधून आपल्या धरणगाव शहरातील लहान मुलांची मूकबधिर शाळा आहे.त्या शाळेमध्ये प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला व तेथील खरोखरच गोरगरीब गरजूवंत तेही आपल्यातलेच आहेत या संकल्पनेतून अन्नदान करण्याचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला वैभव बोरसे यांच्या सर्व मित्र परिवार उपस्थित होता