लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 231ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते तर 168 अर्जाचे टोकन जमा करण्यात आले होते मात्र या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती अर्ज भरले याचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही असे असले तरी सकाळ पासून बोदवड शहरात वीज गुल होती त्यामुळे उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी धावपळ झाली.
बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी साठी आज नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख होती मात्र बोदवड शहरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली ,चार ते साडेचार वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन भरण्यासाठी एकच गर्दी केली होती . अर्ज चे टोकण भरण्याची मुदत सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्याने उमेदवारांनी निवडणूक निर्णय कार्यालयात एकच गर्दी केली होती पाच वाजेनंतर कोणालाही आत घेण्यात आले नाही यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व नाव नोंदण्यात चे काम सुरू होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 231 अर्ज ऑनलाइन भरण्यात आले असून 168 अर्जांचे टोकण निवडणुक निर्णय कार्यालयात जमा करण्यात आले आहेत पूर्वी त्यांचे काम अजूनही सुरू आहे.
कोणत्या पक्षाने किती अर्ज भरले व किती नामांकन भरले याबाबत अजूनही कोणतीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही