वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना वर्धा येथील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या शौचालयात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दिलीय. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली.
पोलिसांनी तत्काळ वसतिगृह गाठून तपासणी केली असता अर्भक मृतावस्थेत असल्याचे समजले. अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलीय. तसेच पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.