• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अधिकाऱ्यांना केली मारहाण : सात जण अटकेत !

editor desk by editor desk
December 3, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
‘त्या’ पोलिसाला मारहाण करणारे दोन अटकेत !

चोपडा : प्रतिनिधी 

चोपडा शहरात पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने १० ते १५ जणांनी चोपडा येथील सपोनि अजित सावळे, हेकॉ संतोष पारधी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जुन्या यावल रोडवर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली होती. यानंतर साने गुरुजी वसाहतीमधील १० ते १५ जण पोलिस ठाण्यात आले. कारवाई केल्याबाबत विचारणा करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावले. यानंतर सावळे व पारधी हे रात्री ११ वाजता पेट्रोलिंग करीत असताना यावल रोडवर उभ्या असलेल्या जमावाने त्यांना अडवले तसेच लोखंडी पट्ट्याने सावळे यांना जबर मारहाण केली तर पारधी यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात जणांना रात्रीच पोलिसांनी अटक केली. फरार असलेल्या इतरांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पो.नि. के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनःश्याम तांबे करीत आहेत. अजित सावळे यांना चोपडा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जमावाने केलेल्या हल्ल्यात सपोनि अजित सावळे यांच्या कानाला अंतर्गत दुखापत झाली असून, डाव्या हाताला जबर मार लागला आहे. याप्रकरणी १० आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात शेख सऊद शेख सलीम कुरेशी (२४), शेख सलीम ऊर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी (५७), जियाउद्दीन गया सुदिन काझी (४३), शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी (५०), शेख नाझीम शेख युनूस शोएब सलीम कुरेशी (४२), शेख मंजूर शेख मकसूद (२४), मजहर सय्यद जहांगीर (२४) यांचा समावेश आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Previous Post

रविवारचा दिवस या राशींना असेल खास !

Next Post

नशिराबाद टोल नाक्यानजीक कारचा भीषण अपघात : महिला ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

नशिराबाद टोल नाक्यानजीक कारचा भीषण अपघात : महिला ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group