Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ८० लाखांची दारू घेवून जाणारा ट्रक पकडला !
    क्राईम

    ८० लाखांची दारू घेवून जाणारा ट्रक पकडला !

    editor deskBy editor deskDecember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग मोठी कारवाई करीत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून भरवस फाट्यावर दमण येथील दारू घेऊन जाणारा कंटेनर पकडत त्यातील सुमारे 14 हजार दारू बाटल्यांसह 80 लाख70 हजारांचा ऐवज हस्तगत केला.

    या कारवाईत उत्तर प्रदेशातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रमजान खान सलमान खान (वय 27, नसीरपूर, पृथ्वीगंज, जि. प्रतापगड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील सहाचाकी कंटेनर (एमएच 04 आरबी 4868) यासह 17 हजार 232 दारूच्या बाटल्यांचे 501 बॉक्सही हस्तगत करण्यात आले. दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे उत्पादित होणारी; परंतु महाराष्ट्रात वितरणास प्रतिबंध असलेली दारू कंटेनरद्वारे नेत असताना ही कारवाई करण्यात आली.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त बा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, ए. एस. तांबारे आदींच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.