Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला व बालक सुरक्षा उपाययोजनेची जनजागृती
    क्राईम

    महिला व बालक सुरक्षा उपाययोजनेची जनजागृती

    editor deskBy editor deskDecember 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : प्रतिनिधी 

    महिला व बालक यांच्या सुरक्षा संबंधाने जनजागृती पर सप्ताह चे आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून, श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शना खाली अकोला पोलीस लॉन येथे दुपारी ०३ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मध्ये व्हिडिओ दाखविण्यात आले, आणि नंतर प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक, श्री संजय सेनगर सदस्य. बाल हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, श्री सुभाष दुधगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला. श्रीमती उज्वला देवकर, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अकोला, सरकारी अभियोक्ता श्री अवतीरक, श्री अक्षय डोंगरे, श्री गोपाल मुकुंदे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी मुलांना कायद्याचे बारकावे समजून सांगत कायदेविषयक मार्गदर्शन केले, आपण आपली सुरक्षा कशी करावी या विषयावर विशेष सूचना देण्यात आल्या जनजागृती करिता मार्गदर्शक सूचना माहिती पत्रक वाटण्यात आले. गुन्हा दाखल झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याचे महत्त्व विशद केले, समाजामध्ये होणारे वाईट घटना, बालविवाह, लैंगिक शोषण प्रतिबंध कसा करता येईल यावर योग्य असे मार्गदर्शन केले.

    तसेच आज दिनांक १.१२.२०२३ ला सकाळी ११ वाजता उत्सव लॉन बाळापूर येथे आयोजन करण्यात आले होते. यां कार्यक्रमाला श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला, श्री गोकुळराज जी. सहायक पोलीस अधीक्षक, बाळापूर, श्री राहुल तायडे तहसीलदार बाळापुर, श्री अनिल जुमळे प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाकरिता बाळापूर येथील शाळा कॉलेज, तसेच अकोला येथील कोचिंग क्लासेसचे विशेष सहकार्य लाभले.

    यानंतर बार्शीटाकळी, पातुर, अकोट, तसेच मुर्तीजापूर या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सिरस्कार पो. नि. सिव्हील लाईन यांनी केले. यशस्वीते करीता श्री. विजय नाफडे पोलीस उपाधीक्षक गृह, श्री जुमनाके राखीव पोलीस निरीक्षक, श्री संखे पोलीस निरीक्षक वायरलेस यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.