• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग : कंटेनर व पिकअपच्या अपघातात ३ ठार २१ जखमी : दोन गंभीर !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 1, 2023
in क्राईम, जळगाव, पारोळा
0

अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

पारोळा तालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असताना पिकअप कंन्टेनरचा अपघात झाला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले आहेत.

पारोळा तालुक्यातील बोळे येथील २० ते २५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधी साठी जात असताना त्यांच्या पिकअप गाडीला पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई गिरासे (वय ६५) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

याबाबत बोळे येथील २० ते २५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावानजीक हा भिषण अपघात झाला. बोळे ता. पारोळा येथून चिलाणे ता. शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी वाहन क्रमांक एम एच १८ एम ५५५४ हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४ यांच्यांत अपघात झाला. यात तीन महिलांचा मृत्यू झाला.

यात रेखाबाई गणेश कोळी ५५ योगिता रवींद्र पाटील वय ४०, चंदनबाई गिरासे (वय ६५) महिलांचा मृतांमध्ये समावेश असून
रणजीत सुरसिंग गिरासे (वय ६०), भरत रामभाऊ गिरासे (वय ६५), राजेशभाई कोळी (वय ४५), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (वय ५०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (वय ४०), भुराबाई तात्या गिरासे (वय ४०), रेखाबाई अधिकार गिरासे (वय ५०), नानाभाऊ सुभाष गिरासे (वय ५५), भटाबाई साहेबराव गिरासे (वय ४५), सुनिता गिरासे (वय ४४), भुराबाई भीमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय ५०), सय्यद लियाकत (वय २१ रा. मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (वय ४०), भीमकोरबाई जगत गिरासे (वय ६०), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय ६५), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (वय ५५), रुपसिंग नवलसिंग गिरासे (वय ६०), दयाबाई रूपसिंग गिरासे (वय ५५), राजेबाई साहेबराव कोळी (वय ४५). आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.

यातील पाच जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले असून अन्य काही जखमींना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उर्वरित जखमींवर पारोळा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजु यादव, अमर वसावे, सुनील हटकर, यांच्या सह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे लगेच रूग्णवाहिका हि दाखल झाल्या त्वरित जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.

Previous Post

मध्यरात्री जळगावात सोन्याचे दुकान चोरट्यांनी फोडले !

Next Post

या राशींचे वाढणार आर्थिक खर्च ; आजचे राशिभविष्य !

Next Post
या राशींचे वाढणार आर्थिक खर्च ; आजचे राशिभविष्य !

या राशींचे वाढणार आर्थिक खर्च ; आजचे राशिभविष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group