जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या नवीपेठ परिसरात आज लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानाचे लाकडी दरवाजाला अडकवलेली लोखंडी पट्टीचे हुक तोडून दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नवीपेठ भागातील वीज गेली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आज १ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला चोरटे आले असून १ वाजून ५३ मिनिटाला तो बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्याचे आणि बाजूच्या इंडिया फर्निशिंग दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा वाकविल्याचे निदर्शनास आले आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांसह श्वान पथकाने भेट दिली असता श्वानाने टॉवर पर्यंत रस्ता दाखविला. दरम्यान या परिसरात युको बँक,सारस्वत बँक ,डीएनएस बँक सारख्या नामांकित बँका असतानाही या ठिकाणी असुरक्षित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने पाहणी केले. तसेच यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.