मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन नेत्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले असतांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरी राजीनाम्याची मागणी केली असली तरी ते आमचे मित्र आहेत. मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास नक्की देणार, असे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भुजबळ हे राज्यात दौरे करून नाशिकमध्ये परतल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. भुजबळ म्हणाले, गारपीटग्रस्तांकडून काही फोन आले. त्यात त्यांनी साहेब तुम्ही काही आलेच नाही, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना सांगितले, आम्हाला तर गावबंदी आहे. तरीपण जोपर्यंत मी आमदार आहे, तोपर्यंत मला मतदारसंघात जाणे आवश्यक आहे. मी तिथे जायला पाहिजे, काम केले पाहिजे अशा शब्दात भुजबळ यांनी गावबंदीबाबत शालजोडीतील टोला लगावला.