सेवानिवृत्ती निमित्त विद्यापीठ कर्मचारी वर्गाचा विद्यापीठ प्रशासनाकडून केला सन्मान!
अकोला प्रतिनिधी: मनीष खर्चे शासकीय, निमशासकीय विभाग तथा खाजगी सेवेतील सेवानिवृत्ती हा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, मात्र ज्या विभागातील सेवेने आपल्याला मानसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक बांधिलकी प्रधान केली आहे त्या सेवेतून निवृत्त होताना आनंदाची तथा दुःखाची संमिश्र भावना कर्मचाऱ्यांचे मनात असते असे सांगताना अतिशय सन्मानाने सेवानिवृत्तीला सामोरे जाणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आयुष्यातील ध्येय असून तो त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने यांनी केले.
कुलगुरू डॉ शरद गडाख यांचे संकल्पनेतून सेवानिवृत्तीला सामोरे जाणाऱ्या विद्यापीठ स्तरीय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सन्मानाने सत्कार आणि शुभेच्छासह निरोप देण्याचा उपक्रम कुलसचिव कार्यालयाकडून राबविण्यात येत आहें. यांच शृंखलेत आज 30 नोव्हेंबर रोजी विद्यापीठातील दोन कर्मचारी विद्यापीठ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आयुष्यातील उमेदीची वर्षे ज्या कार्यालयच्या सेवेत घालवली त्या सेवा काळातील सचोटी, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेची पावतीच जणू कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या दिवशी इतरांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून मिळत असतें आणि याच दिवशी उर्वरित आयुष्य साठी शुभकामना सुद्धा प्राप्त होत असतात असे सांगताना कुलसचिव सुधीर राठोड यांनी आज सेवानिवृत्त होणारे कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी च्या शुभेच्छा आपल्या प्रस्ताविकात दिल्या.
आज ज्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने सेवानिवृत्ती निमित्त निरोप दिला त्यामध्ये उद्यान विद्या विभागांतर्गत भाजीपाला शास्त्र विभागाचे गुलाब हरिभाऊ आसोलकर आणि नियंत्रक कार्यालयातील माणिक काशीराम मुरूमकार यांचा समावेश होता. उपरोक्त कर्मचाऱ्यांनी ज्या विभागात आपल्या सेवा दिल्या त्या विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद सोनकांबळे व विद्यापीठाचे नियंत्रक प्रमोद पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करत त्यांच्या सेवा काळातील विद्यापीठा साठीच्या उपलब्धी सभागृहाला अवगत केल्या.
विद्यापीठ प्रशासनाचे वतीने कुलगुरू डॉ. श्यामसुंदर माने व कुलसचिव सुधीर राठोड यांचे शुभ हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि अंशदान रकमेचा धनादेश देत सन्मान केला. याप्रसंगी अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, कुलगुरूचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, यांच्यासह डॉ.प्रमोद वाकळे, डॉ. निशांत शेंडे, डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. एकनाथ वैद्य, डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. शशांक भराड, नियंत्रक कार्यालयांचे राजीव कटारे, उत्तम राठोड, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, मध्यवर्ती यांची सभागृहात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी अपकुलसचिव सामान्य प्रशासन विभाग राजेंद्र पोयाम व त्यांचे सहकारी वर्गानी परिश्रम घेतले.