मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात दिवाळीचा सण संपला असून आता लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. अशातच लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार लग्नसराईत देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. एचडीएफसीचे सिक्योरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्याचा भाव होऊ शकतो. लवकरच सोन्याचा दर हा ६७ हजारांपर्यंत जाऊ शकतो. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. दसऱ्याच्या काळात सोन्याचा भाव हा ६२ हजारांपर्यंत पोहोचला होता. अशातच आज सोन्याने ६३ हजारांचा टप्पा पार केला आहे. सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली आहे. पुढच्या वर्षात सोनं अधिक महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई- ६३,३८० रुपये
पुणे – ६३,३८० रुपये
नागपूर – ६३,३८० रुपये
नाशिक – ६३,४१० रुपये
ठाणे – ६३,३८० रुपये
अमरावती – ६३,३८० रुपये