Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नव्या नवरीने कारनाम्याने सासऱ्याच्या मंडळीचे टेन्शन वाढले !
    क्राईम

    नव्या नवरीने कारनाम्याने सासऱ्याच्या मंडळीचे टेन्शन वाढले !

    editor deskBy editor deskNovember 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशात गेल्या काही वर्षापासून लग्नाच्या नावावर अनेक गुन्हेगारीसह चोरीच्या अनेक घटना घडत असतांना अशीच एक घटना हरियाणामधून समोर आली आहे. सासरी नांदायला आलेल्या नव्या नवरीने आपल्याच घरात चोरी केली आहे. पहाटे ४ वाजता नवरीने घरातील धनसंपत्ती लंपास केली आणि फरार झाली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण गावात या घटनेचीच चर्चा होतेय.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेवाडी गावात राजकुमार शर्मा आपल्या लग्नामुळे तो फार खुश होता. घरात नवी नवरी आल्याने आनंदाचं वातावरण होतं. नवरीला पाहण्यासाठी संपूर्ण गावातून व्यक्ती तिला पाहण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी येत होते. गावात सुंदर नवरीची चर्चा होती. पुढे ही चर्चा चोरीबाबत होईल असं कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. नवरी आपल्या सासरी आल्यावर तीन दिवस मोठ्या आनंदाने राहिली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिने तिचा डाव साधला. नवरीने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पळून जाण्याचा प्लान आखला. तिसऱ्या दिवशी ती पहाटे ४ वाजता उठली. घरात सगळे झोपले असताना तिने सावकाश कपाटातील आणि तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरले आणि ती फरार झाली.

    सकाळी घरातील इतर मंडळी उठल्यावर त्यांना नवरी बराचवेळ कुठेच दिसली नाही. काही वेळ वाट पाहिल्यावर सर्वांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर तिच्या आई बाबांची भेट घेण्यात आली. मात्र याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपली फसवणूक झाली असून नवरी दागिने घेऊन फरार झाल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नवरीचा फोटो जवळ घेतला असून घराबाहेर असलेले सीसीटीव्ही तपासले आहे. यात नवरी पहाटे ४ वाजता घराशेजारी असलेली भींत ओलांडून पळून गेल्याचं दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणी नवरीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.