जळगाव : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दिले.
राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास यामुळे हिराविला आहे. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे शासकीय यंत्रणा तत्काळ रावळण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात ही शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पालकमंत्र्यांनी आढावा घेत तत्काळ पंचनामा करावे असे आदेश प्रशासनाला दिलेले आहे.