जळगाव : प्रतीनिधी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कजगाव परिसरात दि. २६ रोजी संध्याकाळी व मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसासोबतच वादळी वारा देखील असल्यामुळे केळीचे घड जमिनिवर कोसळले असून वेचणीला आलेल्या कापसाचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. तसेच तूर, मका, ऊस, दादर आदी पिकांसह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने कजगाव परिसरातील अनेक शिवारात विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतातील पिके आडवी पडली असून शेतातील पिके भूईसपाट झाले आहेत. वेगवेगळ्या संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा देखील फटका बसला आहे. शेतातील पीक बहरत असतांना अवकाळीच्या तडाख्याने नुकसानीच्या खाईत लोटले गेल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे मध्यरात्री पासून जोर धरलेल्या पावसाने दिनांक २७ च्या सकाळीही चांगलेच झोडपल्याने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दिसून आले अनेक शेतात अवकाळी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याचे प्रमाण अधिक होते पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.